कोरोना विषाणू उद्रेकाचे वार्तांकन करताना घ्यावयाची काळजी

PEDRO PARDO / AFP

२० मे, २०२१ रोजी अद्यतनित (अपडेट) केलेले

जागतिक आरोग्य  संघटनेने (WHO) कोविड- १९  (अर्थात कोरोना विषाणू) च्या झालेल्या उद्रेकाला ११ मार्च २०२० रोजी वैश्विक साथ म्हणून घोषित केले. कोविड संदर्भातील जागतिक परिस्थिती सतत बदलत आहे. सामोरी येणारी कोरोना विषाणूची नवीन नवीन उत्परिवर्तित रूपे   (variants) आणि एकूण लसीकरणाचे  प्रमाण, यावर अवलंबून त्यानुसार अनेक देश त्यांचे प्रवासावरील निर्बंध तसेच एकूण सुरक्षिततेचे नियम शिथिल करत आहेत, किंवा काही ठिकाणी अजून कडक करत आहेत, असे हाती येणाऱ्या वृत्तानुसार कळते.  

हा विषाणू आणि त्याला रोखण्यासाठी सरकारकडून उचलली जाणारी पावले याबाबत जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात  जगभरातील पत्रकार महत्वाची भूमिका बजावत आहेत. ह्या वार्तांकनासाठी करावा लागणारा प्रवास, आणि मुलाखतीसाठी विविध माणसांना भेटणे  यामुळे पत्रकार मात्र संकटात सापडू शकतात. कारण ह्या सर्वांदरम्यान विषाणूची लागण होण्याचा धोका पत्रकारांसमोर सतत उभा ठाकलेला असतो.

निर्बंधांबद्दलच्या नवनवीन घडामोडींची ताजी माहिती मिळवण्यासाठी कोविड संदर्भातील वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत प्रसृत करण्यात येत असलेली माहिती तसेच स्थानिक आरोग्य खात्यातून प्रसारित होणारी माहिती, याकडे लक्ष ठेवावे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे कोरोना विषाणू माहिती केंद्र (Coronavirus Resource Center) हा या महासाथी बाबतच्या बातम्या मिळवण्यासाठीचा खात्रीचा पर्याय आहे.

वृत्तांकन करताना घ्यायची काळजी 

आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियम तसेच त्यादरम्यान पाळण्यात येणारे सुरक्षिततेचे नियम हे सध्या सतत बदलत आहेत. त्यामुळे वृत्तांकनाची कामे अचानक किंवा अतिशय थोडीशी पूर्वसूचना देऊन रद्द होऊ शकतात. 

लसीकरण झाले असले तरी एखादी व्यक्ती विषाणूची वाहक असू शकते. त्यामुळे ज्यांचे लसीकरण झाले आहे, अशा माध्यमकर्मींनी हे लक्षात ठेवावे, असे अमेरिकेतील सीडीसी ने सांगितले आहे. तर येल मेडिसिन च्या मते विषाणूच्या विविध उत्परिवर्तित रूपांविरुद्ध विविध लशी ह्या कमीजास्त पातळीचे संरक्षण पुरवतात. त्यामुळे माध्यमकर्मींनी शारीरिक अंतर बाळगणे तसेच मास्कचा वापर करणे असे कोविड -१९ सुसंगत वर्तन करणे अपेक्षित आहे.  

कोविड-१९ चे वार्तांकन करणाऱ्यांनी खालील खबरदारी जरूर घ्यावी.

असाईनमेंट पूर्वी

तुमच्या भागात संसर्ग होण्याचे प्रमाण किती आहे, यावर अवलंबून ऑनलाईन किंवा दूरध्वनीद्वारे इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करा. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष भेटी शक्यतो टाळा.

 मानसिक स्वास्थ्य 

स्वतःला आणि दुसऱ्यांना संसर्ग होण्यापासून दूर ठेवणे

तुम्ही कुठल्या देशात आहात, त्यानुसार शारीरिक/सामाजिक अंतर पाळण्याचे नियम वेगळे असू शकतात. खाली दिलेल्या यादीतील एखाद्या ठिकाणी जर तुम्ही वार्तांकन करत असाल, तर तेथे गरजेच्या सुरक्षा नियमनाची आधीच चौकशी करा. 

सामान्यतः संसर्ग होऊ नये यासाठी दिल्या जाणाऱ्या सूचना खालीलप्रमाणे:    

स्वसुरक्षेची वैद्यकीय साधने

चेहऱ्याचे मास्क

चेहऱयावर लावण्याच्या मास्कचा योग्य वापर हा पत्रकारांसाठी अत्यावश्यक आहे. विशेषतः कोंदट अथवा दाटीवाटीच्या ठिकाणी वावरताना किंवा जंतुसंसर्गाचा धोका जास्त असेल अशा ठिकाणी वार्तांकन करताना त्याची फारच गरज आहे. खुल्या, हवेशीर जागांपेक्षा कोंदट ठिकाणी हवेतील विषाणूंचे प्रमाण नेहमीच जास्त असते. त्यायोगे तुम्हाला संसर्ग होण्याचा धोकादेखील जास्त असतो.

नीट वापर न केल्यास, खुद्द मास्कच जंतुसंसर्गाचे साधन बनू शकतो. सर्जिकल मास्कवर वापरानंतर सात दिवसांपर्यंत विषाणू राहू शकतो, आणि तो संसर्ग पसरवू शकतो, असे ‘लॅन्सेट’ मध्ये प्रकाशित संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे मास्क लावलेला असताना चेहऱ्याला हात लावणे, अथवा मास्क काढून टाकणे, अथवा त्याचा पुनर्वापर करणे याने संसर्गाचा धोका उद्भवू शकतो.

मास्क घातला असल्यास पुढील सूचना पाळा.

उपकरणांची काळजी  

विजेवरच्या उपकरणांची स्वच्छता   

डिजिटल सुरक्षा 

प्रत्यक्ष असाईनमेंटच्या वेळची स्वसुरक्षा 

आंतरराष्ट्रीय वार्तांकनाची कामगिरी

असाईनमेंट संपल्यानंतर

तुम्हाला आजाराची लक्षणे दिसू लागल्यास 

सीपीजे तर्फे निर्माण करण्यात आलेले ऑनलाईन सुरक्षा कीट पत्रकार आणि माध्यमांना सुरक्षेसंबंधी मूलभूत मार्गदर्शन आणि माहिती पुरवण्याकरता तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये शारीरिक सुरक्षा, डिजिटल सुरक्षा आणि मानसिक काळजी यासंबंधी तसेच सामाजिक उठाव, निदर्शने तसेच निवडणुका इ. चे वार्तांकन करण्याबाबत उपयुक्त माहिती आणि उपाय आहेत.  

संपादकांची सूचना: ह्या सूचना मूलतः १० फेब्रुवारी २०२० ला प्रकाशित केल्या होत्या. त्यात सातत्याने बदल करण्यात येत आहेत. सर्वात वर असलेली प्रकाशनाची तारीख पाहून ह्या सूचना किती ताज्या आहेत हे कळेल.

Exit mobile version